संस्थेविषयी
001_ShivajiraoPandit
मा.ना.श्री.शिवाजीराव पंडित

संस्थापक अध्यक्ष

अधिक माहितीसाठी
002_AmarsinhaPandit
मा.आ.श्री. अमरसिंह पंडित

अध्यक्ष

अधिक माहितीसाठी
003_JaisinghPandit
मा.आ.श्री. जयसिंह पंडित

सचिव

अधिक माहितीसाठी
004_VijaysinhPandit
मा.श्री. विजयसिंह पंडित

उपाध्यक्ष

अधिक माहितीसाठी
Gorkar-Sir-2

श्री. प्रमोद दिगंबरराव गोरकर

मुख्याध्यापकांचा संदेश

नमस्कार...!
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे ? मा. दादासाहेबांचे ध्येय पूर्ण झाले. ....!
मुख्याध्यापक, श्री.प्रमोद गोरकर

गेवराई तालुक्यातील आर्थिक व दुर्बल घटकातील सर्वसामान्य कुटुंबातील मुल- मुली यांनी शिकून स्वावलंबी झाले पाहिजे. हे स्वप्न मनाशी बाळगून गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते शिक्षण महर्षी मा. शिवाजीराव (दादा )पंडित यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज ओळखून तालुक्यात शिक्षणाचे जाळे विणले. यातुनच जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाची सन 1974 मध्ये स्थापना केली. पहिली शाळा जयभवानी हायस्कूल शिवाजीनगर गढी ची स्थापन करण्यात आली. व त्यानंतर गरजेनुसार शिक्षणाबरोबरच व्यवसायिक शिक्षण व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे . या हेतूने नवीन वेगवेगळ्या शाखा सुरू करण्यात आल्या. याच संस्थेला पुढे घेऊन जाण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष मा. अमरसिंहजी पंडित व सचिव मा.जयसिंग पंडित यांनी उच्च व तंत्र शिक्षण शिक्षणाची सोय तालुक्यात सुरू केली. तसेच या संस्थेच्या शाखा तालुक्यातच न राहता तालुक्याच्या बाहेर व जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर नेण्याचे काम अध्यक्ष व सचिव साहेब यांनी केले.1974 ते आजपर्यंत या संस्थेच्या पन्नास शाखा कार्यरत आहेत. त्यातीलच सन 1987 साली,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तलवाडा ता.गेवराई जिल्हा बीड या विद्यालयाची स्थापना झाली. या ग्रामीण भागातील शाळेतून तलवाडा परिसरातील बारा वाड्या व सर्व ग्रामीण भागातील शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रशासकीय सेवा, राष्ट्रीय संरक्षण सेवा ,वैद्यकीय सेवा, शिक्षण , उद्योजक जनसंपर्क ,आणि पत्रकारिता ,ग्रामीण भागातील एक आधुनिक शेती, व क्रीडा इत्यादी बरोबर अनेक क्षेत्रांमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाव नावलौकिक केला आहे. या शाळेने अनेक शिक्षक डॉक्टर, इंजिनिअर, चांगले अधिकारी समाजाला दिले आहेत. यातच डॉ. जयश्री बांगर, डॉ. अमोल करडे हे वैद्यकीय अधिकारी, तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये डॉ.राणी पवार असे अनेक विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्या समन्वयातून घडवण्याचे काम या शाळेने केले. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.संस्थेने आमच्यावर दिलेली जबाबदारी,टाकलेला विश्वास, या शाळेची प्रगती व समाजामधील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आम्ही व आमचा सर्व शिक्षक वृंद पुढे नेण्याचे काम करत आहे.व करत राहू. आमच्या विद्यार्थ्यांना देशभक्ती व देश सेवेचा सुगंध लाभण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढू. यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन आमच्या विद्यालयातील शैक्षणिक विचार पालकापर्यंत पोहोचण्यासाठी, व विद्यालयांमध्ये होणारे अध्यापनाचे काम हे त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी व पालकांच्या अडचणी शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक पेज व यानंतर आता या संकेत स्थळाची निर्मिती करत असताना आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. ..

Read More
1+
एकूण विद्यार्थी
1+
कार्यरत शिक्षक
1+
नवीन प्रवेश
1+
पालक संपर्क
शाळेतील चालू घडामोडी

शाळेतील दैनंदिन तसेच विविध उपक्रमांची माहिती.

अधिक माहितीसाठी
आमच्याविषयी

प्रशासकीय माहिती

  • शाळेची स्थापाना -1987
  • मान्यता आदेश क्र. (3.1) 145 -दिनांक 01/01/1987
  • शिक्षण खाते मान्यता क्र. मावि 5/93-94/ नमाशा/ 6148/ ७०६५ बीड दि.30-02-1993
  • शाळेचे माध्यम मराठी/ सेमी इंग्रजी
  • पे युनिट कोड 04330400012
  • एस.एस.सी.बोर्ड आदेश क्र.57.04.012
  • डायस कोड 27270520002
  • एच.एस.सी.बोर्ड आदेश क्र.57.04.012
  • शिष्यवृत्ती सांकेतांक ५३ . ०४ . २५
  • शाळेचे माध्यम मराठी/ सेमी इंग्रजी
Read More
अभियांत्रिकी प्रवेश
36 वर्षामध्ये सुमारे 204+ विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेला प्रवेशित.
यशवंत विद्यार्थी
IIT मध्ये 2+, NIT साठी 3+ CA साठी 5+,विद्यार्थ्यांची निवड,शिक्षक ३००+
वैद्यकीय शाखेत यश
109+ विध्यार्थी MBBS/BAMS/BHMS व इतर शाखेत प्रवेशित
शाळेची वैशिष्टे
सुसज्ज इमारत

आजच्या संगणक युगात विद्यार्थ्यांना संगणक वापरण्यासंदर्भातील ज्ञान मिळण्यासाठी संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली.

अधिक माहितीसाठी
अद्ययावत संगणक कक्ष

विद्यार्थ्याच्या सर्वंगिण विकासासाठी विद्यालय सतत प्रयत्नशील आहे. केल्याने होत आहे, आधी केलेचि पाहिजे.

अधिक माहितीसाठी
अनुभवी शिक्षक वृंद

प्रत्येक विषयाचे अनुभवी शिक्षक, दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, विषयाचे अद्ययावत ज्ञान ठेवण्यासाठी प्रशिक्षणात सहभाग.

अधिक माहितीसाठी
सुसज्ज ग्रंथालय

अवांतर वाचनासाठी अनेक संदर्भ ग्रंथ, सर्व विषयातील संकल्पनासाठी आवश्यक पुस्तकांचा संग्रह, वर्गनिहाय स्वतंत्र ग्रंथालय.

अधिक माहितीसाठी
जादा तासिकांचे आयोजन

इ.१० साठी उन्हाळी वर्गाचे तसेच वासंतिक वर्गाचे आयोजन, शिष्यवृत्ती परीक्षा सह विविध स्पर्धा परीक्षांसाठी जादा तासिकांचे आयोजन.

अधिक माहितीसाठी
खेळ व क्रिडा विभाग

विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासासाठी भव्य क्रीडांगणाची उपलब्धता, मुलांना दररोज खेळाचे विशेष मार्गदर्शन

अधिक माहितीसाठी
स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

विविध ऑलाम्पियाड, एम.टी.एस., एन.एम.एस., मंथन सह विविध शिष्यवृत्ती परीक्षासाठी योग्य मार्गदर्शन व सराव परीक्षा.

अधिक माहितीसाठी
सांस्कृतिक विभाग

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय चित्रकला, व्यंगचित्र प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन व हस्ताक्षर सुधार प्रकल्प.

अधिक माहितीसाठी
डिजीटल क्लासरुम

वर्गाध्यापानासाठी स्वतंत्र डिजिटल स्मार्ट बोर्डची व्यवस्था, वर्गवार विविध ऑडिओ व व्हिडिओ साहित्य.

अधिक माहितीसाठी

फोटो गॅलरी

संपर्क

संपर्क करण्यासाठी योग्य माहिती द्या. आपले मत महत्वाचे आहे.

mvtalwada@gmail.com
Madhyamik Vidyalay Talwada

Mo.No.9822469100 9011709630